जळगाव जामोद,दि२२(प्रतिनिधी):
सातपुड्याच्या कुशीत दुर्गम असलेल्या भागात अंबाबरवा अभयारण्य आहे. अभयारण्याला या शासनाचा मानाचा तुरा मिळाला आहे. सातपुड्यात वनसेवेतील प्रभावी कामाबाबत शासनाने सुवर्ण पदक घोषीत केले आहे. त्यामध्ये अंबाबरवा अभयारण्यात सेवा देणाऱ्या वनरक्षक कपील मोरे अमरावती विभागात सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरले आहेत.
महसुल व वन विभागाने सन २२ -२३ साठी ही निवड घोषीत केली आहे . त्याबाबत सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पत्र प्राप्त झाले आहे. यामूळे सुवर्णपदक प्राप्त वनरक्षक मोरे यांचेवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते शेतकऱ्यांच्या कुटूंबातून शासकीय सेवेत दाखल झाले आहेत . त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी वन्यजीव विभागाकडे कर्तव्यदक्ष म्हणून वरिष्ठांकडे लौकिक मिळवला आहे.
गुरुवार २१ मार्च जागतिक वनदिनी हा पुरस्कार मुंबई येथे मोरे यांना प्रदान झाला आहे. या आधी सन १९२० मध्ये अंबाबरवा बीट च्या वनरक्षक कु. रुपाली राऊत यांना सुवर्ण पदक देऊन शासनाने गौरविले होते. आता दुसऱ्यांदा अंबाबरवा अभयारण्याला मिळालेला हा सर्वोच्च बहुमान आहे.