जळगाव जामोद, दि१०(प्रतिनिधी):
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कामगार कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील यांच्या कल्पनेतून जळगाव जामोद शहरातील नगर परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाण्याची सुविधा व्हावी यासाठी कैलास पाटील यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला. यानिमित्ताने जळगाव जामोद शहरातील श्रीसंत रुपलाल महाराज नगरपरिषद शाळा,
श्री प्रगटेश्वर नगरपरिषद प्राथमिक शाळा,श्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळा, नगरपरिषद कन्याशाळा, महात्मा फुले कन्या शाळा अशा पाच शाळांमधील जवळपास ८२० विद्यार्थ्यांना पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले… त्याचसोबत महिला दिनाचे औचित्य साधून यावेळेस सर्व मराठी नगर परिषद शाळा मधील महिला शिक्षकांना सुद्धा भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील आणि आणि प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते पाणी बॉटल वाटप करण्यात आले.याप्रसंगी सर्व नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ठेंग, शिवहरी रोजतकार, मुकुंद भालेराव, अनिल ढगे, ज्योती गाठे मॅडम यांच्यासह शिक्षण लिपिक गजानन मोरे, शिक्षक महादेव सातव तसेच सर्व शाळा मधील शिक्षक व शिक्षिका यांची उपस्थिती होती.तर हा पाणी बॉटल वाटप कार्यक्रम भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, माजी नगरसेवक निलेश शर्मा, माजी नगरसेवक कैलास डोबे, , पांडुरंग मिसाळ ,अभिमन्यू भगत, भाजपा महिला आघाडीच्या सुनिता म्हसाल, सुनीता नानकदे, शीतल निमकर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.