मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी घेतला सहभाग.
मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि १८(प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे श्री आवजीसिद्ध महाराज भंडारा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री.आवजीसिद्ध महाराज मंदिर ते प्रवेशद्वार पर्यंत चा मुख्य रस्ता स्वच्छ करत स्वच्छता उपक्रम राबविला.
श्री.आवजीसिद्ध महाराज हे या परिसरातील जागृत देवस्थान आहे.पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या भंडारा महोत्सवाला येतात.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा मातोश्री नथियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानाचा उपक्रम हाती घेऊन श्री आवजीसिद्ध महाराज मंदिर व परिसरातील कचरा स्वच्छ केला.मंदिर परिसराची स्वच्छता करताना विद्यार्थ्यांना पाहून गावातील नागरिकांनी कौतुक केले. विशेष म्हणजे हा उपक्रम विद्यार्थी स्वयंप्रेरणेने राबवतात.मदिर परिसर स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या जास्त होती.
या अभियाना प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके, सहाय्यक शिक्षक एस डब्लू इंगळे,उमेश पाटील ,शुभम कुलट, डिके सर ,अतुल पाटील, तेजस बोंबटकार, उमाळे मॅडम, गवई मॅडम, निखिल धुळे, विशाल वसूलकार ,सुवर्णसिंग राजपूत यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
