दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मंगेश गिऱ्हे यांच्या शैक्षणिक व्हिडिओला पुरस्कार 

0
47

मोल कॉन्सेप्ट चा व्हिडिओ ठरला लक्षवेधक 

मंगेश राजनकार

जळगाव जामोद, दि२२ (प्रतिनिधी):

आधुनिक शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांना डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षकांनी व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करावे याकरिता शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विषयाची प्राध्यापक मंगेश गजानन गिऱ्हे यांना दिनांक २१ एप्रिल रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांचे द्वारा आयोजित

‘शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धचा निकाल लागला असून त्यासाठी बक्षीस वितरणाचा समारंभ दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे पार पडला त्यामध्ये जळगाव जामोद येथील दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. मंगेश गजानन गिऱ्हे यांना ११ वी १२वी विज्ञान गटामध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे . पुरस्कार वितरणाच्या वेळी वाघ सर 

(उपशिक्षणाधिकारी माध्यमिक बुलढाणा.), कार्यक्रम अध्यक्ष

डॉ.जे.ओ.भटकर सर (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा.), डॉ. मारोती गायकवाड ( वरिष्ठ अधिव्याख्याता आयटी विभाग प्रमुख जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा),राजेंद्र अजगर (अधिव्याख्याता समन्वयक) ,मोहम्मद अकील सहाय्यक योजना अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. दि.२२ एप्रिल रोजी न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य अविनाश कुळकर्णी , उपप्राचार्य शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकार तायडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस. एफ. पाटील व उपस्थिती शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हास्तरीय पुरस्काराबद्दल प्राध्यापक मंगेश  गिऱ्हे यांचा सत्कार केला.              

 व्हिडिओ निर्मिती काळाची गरज -जळगाव-अध्यापनात दृकश्राव्य साधनांचा वापर करावा त्यांने अध्यापन प्रभावी होते. मात्र आता आधुनिक काळात घरोघरी अँड्रॉइड फोन आल्यामुळे शिक्षकांनी अध्यापनातील संकल्पनांवर आधारित व्हिडिओ निर्मिती केली तर प्रभावी अध्यापन होऊन. विद्यार्थ्यांकरता आनंददायी शिक्षण निर्मिती सहज होते असे मौल्यवान मार्गदर्शक उपस्थित मान्यवरांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here