जळगाव जामोद तालुक्यात फिर्यादी च्या घरी नोंदविला पहिला ऑन द स्पॉट एफ आय आर – पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची संकल्पना

0
124

जळगाव जामोद,दि१९( प्रतिनिधी):

जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने सामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे. ‘ON THE SPOT FIR’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेची माहिती दिनांक ५ एप्रिल रोजी बुलडाणा येथे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या योजनेंतर्गत, बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोबाईल अथवा गोपनीय माहितीच्या माध्यमातून दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाली, तर त्वरित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल होतील. त्यांच्या सोबत लॅपटॉप, स्कॅनर,प्रिंटरसह आवश्यक साधनांनी सज्ज असलेले शासकीय वाहन सोबत . या योजनेमुळे महिलांवर होणारे अत्याचार बालकांवरील गंभीर गुण निर्देशक नागरिकांवर अन्याय यासारख्या गंभीर गुन्हा मध्ये तात्काळ कारवाई होणार असून त्यामुळे घटनास्थळीच एफ आर ची नोंद होऊन तपासात वेळ न गमावता पुढील कारवाई शक्य होणार आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून जळगाव जामोद तालुक्यातील चावरा या गावी तालुक्यातून पहिलीच ऑन द स्पॉट एफ आय आर दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीने डायल ११२ नंबर वन कॉल करताच पोलीस फिर्यादीच्या घरी जाऊन तक्रार कर्त्याच्या घरी जाऊन दिनांक १८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजुन ४७ मिनिटांनी पहिलाच एफ आय आर नोंदविण्यात आला आहे. ग्राम चावरा या गावी तक्रार कर्त्या महिलेला काही दिवसापासून आरोपी शिवशंकर गोपाळ भटकर हा वाईट नजर ठेवून होता. आरोपींनी दिनांक ११ एप्रिल रोजी फिर्यादीला तुझ्या नवऱ्याला सोडून दे माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझ्या नवऱ्याला व मुलाला जीवाने खल्लास करून टाकीन अशी धमकी दिली होती. तसेच आरोपीने तक्रार करता महिलेचे वाईट उद्देशाने दोन्ही हात पकडून तू माझ्याशी लग्न करते का नाही अशी बोलून शिवीगाळ करत तुला व तुझ्या कुटुंबाला गावात राहू देणार नाही व माझे जीवाचे काही पण बरे वाईट करून खोट्या केस मध्ये फसवून टाकीन अशी धमकी दिली तसेच आरोपीची आई सुरेखा बाई गोपाळ भटकर हिने फिर्यादी असलेल्या महिलेच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशनच्या लँडलाईन वर कॉल करून माहिती दिली माहितीवरून घटनास्थळावर पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित व महिला पोलीस उपनिरीक्षक शेडगे मॅडम यांनी घटनास्थळी जाऊन ईमेल द्वारे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून आरोपींविरुद्ध अप नं २२९/२०२५ कलम ७४ ,११५(१),३५२,३५१(२)३(५) भारतीय न्याय साहित्य नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच घटनास्थळीच संपूर्ण तपास करून आरोपीस अटक करून २४ तासाच्या आत आरोपी विरोधात विद्यमान न्यायालयात १०८/२०२५ दोषारोप पत्र दाखल करून आरोपी विरोधात तपास बीट अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शेडगे मॅडम यांनी २४ तासाच्या आत पूर्ण केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव जामोद पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या आदेशाने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here