जळगाव जामोद, दि१७ ( प्रतिनिधी):
दिनांक 14/4/2025 ला रवि भवन नागपूरला आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
महाराष्ट्र अनु, जाती जमाती आयोगाचे उपाअध्यक्ष धर्मपाल मेश्राम साहेब यांनी प्रशासनातील बेजबाबदार व विशेष करून पारधी समाजाच्या समस्या बाबत जाणून बुजुन दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी यांना निर्वाणीचा इशारा दिला
डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित अन्याय ग्रस्त आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला 28 जिल्हयातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी, वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रकरणे ॲड धर्मपाल मेश्राम साहेब यांच्याकडे निकाली काढण्यासाठी देण्यात आले अनु जाती जमाती आयोगाकडे देण्यात आलेली प्रकरणे ही प्राधान्याने निकाली काढण्यात येतील व दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आदिवासी पारधी समाजाच्या लोकांना जाणून बुजुन त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला या संकल्प परिषदेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके आणी पदाधिकारी उपस्थित होते
जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध समस्यांचे निवेदन सादर करून समाजाला न्याय मिळावा असे चर्चा सत्रात निवेदनात नमूद केले निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मागण्या बुलडाणा येथे आदिवासी मला मुलींचे 500 विद्यार्थी असलेले वस्थीगृह करण्यात यावे बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या पदाधिकारी नोकरदार समाजकार्य करणाऱ्या तसेच गरीब आदिवासीवर दाखल केलेले खोटे गुन्हे खारीज करण्यात यावे बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालय मिळावे संग्रामपूर, जळगांव जामोद येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेची निर्मिती करण्यात यावी तसेच आदिवासी समाजवर होणारे अन्याय अत्याचार थांबवावे वरील मागण्यांचे निवेदन सादर केली या वेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके, उखरडा सोळंके, बाळूभाऊ डाबेराव, कैलांश चव्हाण, अजित डाबेराव, अन्जुर पवार इत्यादी आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते