हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा,

0
106

हिवरखेड पत्रकार संघाची मागणी,

प्रतिनिधी, हिवरखेड:-

हिवरखेड येथील तरुणांचा आकोल्यातिल झालेल्या हल्ल्यात मुत्यु झाला तर जेष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर सुद्धा भ्याड हल्ला भुट्टे चोर ,दारुड्यानि केला व ते जखमी झाले  असे हल्ले न व्हावे या हल्ल्याना आळा बसावा याकरिता  पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी  हिवरखेड पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली,  हिवरखेड येथील पत्रकार संघाच्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले , 

हिवरखेड येथील तरुणावर आकोल्या हल्ला झाला ,हेमंत गावंडे या युवकाचे या हल्ल्यात प्राण गेले, तर जेष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर सुद्धा हल्ला झाला व ते जखमी  झाले, पोलीस बांधवांनी हल्लेखोरांनवर कठोरपणे कारवाई करून या अशा घटनेना आळा घालावा याकरिता, हिवरखेड येथील आदर्श पत्रकार संघाचे व ग्रामीण पत्रकार संघटनाचें पत्रकार यांनी  पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार  पो, जाधव साहेब,  प्रफुल पवार, धीरज साबळे, यांच्याकडे निवेदन दिले, यावेळी पत्रकार 

राजेश पांडव,संदीप इंगळे,  अनिल कवळकार,  धिरज बजाज ,  जितेश कारिया , सूरज चौबे,अर्जुन खिरोडकार उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here