प्रतिनिधी मंगेश बहुरूपी :-
वडकीत स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज येथे महिला दिन जल्लोषात साजरा.
महिला व विद्यार्थ्यांचा सत्कार
महिला दिनी अनाथ व वृद्धाश्रमास धनराशी भेट.
शिक्षक वृंद व पालक विद्यार्थ्यांनी साजरा केला आगळावेगळा जागतिक महिला दिन
————————————–
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्मॉल वंडर हायस्कूल वडकी तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन स्मॉल जुनियर कॉलेज वडकी येथे करण्यात आले होते या प्रसंगी
सत्कारमूर्ती म्हणून सौ. माधवी शिवाजी चौधरी , प्रेममदिर अनाथ आश्रम संचालिका वर्धा या प्रामुख्याने उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून
नम्रता काकडे, माजी सरपंच किन्ही, संजीवनी वानखेडे ब्यूटी मेकअप आर्टिस्ट व प्रशिक्षिका. ,निखत फारुख शेख. सहाय्यक प्राचार्य यवतमाळ, कलावती कोरडे , वडकी सरपंच , प्राचार्य व अखिल भारतीय पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष महिला सामाजिक मंच डॉ.मंजुषा सागर , ज्योती करमनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्व महिला कार्यकर्त्यांना व शालेय शिक्षकांना ट्रॉफी व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनाथ आश्रमच्या कार्याबद्दल डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.
विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी धनराशी गोळा करून वृद्धाश्रमासाठी माधवी चौधरी यांना सोपवली. पालक अनिल ताजने यांनीही स्त्री ची जीवनातील भूमिका समजावून सांगितली. सर्व गणमान्य अतिथीनी मोलाचे मार्गदर्शन केले. बहुसंख्येने पालक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचालन ज्योती गजबे आणि अश्विनी तुराले मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन अहमद शेख सरांनी केले.
प्रमुख पाहुण्यांनी मोलाचे विचार प्रकट केले
आनंदाने उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक निता फुटाणे, शननो शेख ,शंकर मालखेडे नितीन गवळी, विजय फुळकर , योगिनी भोयर, रुबी शेख, दामिनी फुटाणे अक्षय वानखेडे, वैभव कोरडे सर्वांनी सहकार्य केले.