प्रतिनिधी:-
“बेटी बचाव बेटी पढाव” या उपक्रमांतर्गत तसेच जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधुन महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन दि.०७ मार्च २०२५ रोजी जिल्हा परीषद अकोला ते हुतात्मा स्मारक नेहरू पार्क चौक अकोला दरम्यान दुपारी ०४.०० वाजता वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनची सुरवात ही जिल्हा परीषद अकोला येथुन मा.श्री अजित कुंभार, जिल्हाधिकारी अकोला व मा. श्रीमती बी.वैष्णवी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला, मा.श्री.बच्चनसींह जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला हे हिरवी झेंडी दाखवुन करणार आहेत. तरी अधिकाधीक महीलांनी या वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री. गिरीश पुसदकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अकोला व श्रीमती राजश्री कौलखेडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण जिल्हा परीषद अकोला यांनी केले आहे