जि प कें म प्रा शाळा वडशिंगी येथे जागतिक जलदिन निमित्ताने रॅली, जलप्रतिज्ञा आणि जलपूजन संपन्न

0
249

जळगाव जामोद, दि२२(प्रतिनिधी):

सन 2016 पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने 16 मार्च ते 22 मार्च हा जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असतो. पाण्याचा होणारा अपव्यय तसेच पाण्याची सुरक्षितता यासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून नियमित शासन स्तरावर पाणी बचतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. जसे की पाणी आडवा पाणी जिरवा, जल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे यासारखे उपक्रम शासनातर्फे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबविल्या जातात.

जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे आज दि 22 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे 22 मार्च रोजी जलपूजन व जल जागृती रॅली काढून जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने गावातून जल बचत आणि जलसंवर्धना बाबत नारे देत जनजागृती रॅली शाळेच्या वतीने काढण्यात आली. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी जलप्रतिज्ञा घेऊन पाणीबचत व पाण्याचे संवर्धन पाण्याचे महत्व याबाबत शाळेचे शिक्षक भटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेजवळील भवानी माता मंदीरातील विहिरी वर जाऊन जलपूजन करण्यात आले.

22 मार्च जागतिक जलदिन सप्ताहाच्या या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक  विजय म्हसाळ सर,शिक्षक बांगर सर,भटकर सर,हिस्सल सर,येनकर मॅडम, राजगुरे मॅडम यांचेसह सर्व विद्यार्थी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here