वनपरिक्षेत्र जळगाव जामोद वनपाल पी एन जाधव रुजु झाल्याने समाजवादी च्या वतीने सत्कार

0
30

जळगाव जामोद, दि२१(प्रतिनिधी):

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात वनांचा भाग असून जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता नेहमीच भासत असते, त्यातच आता जळगाव जामोद वनपरिक्षेत्रामध्ये वनपाल म्हणून पी एन जाधव हे दिनांक 6 मार्च रोजी रुजू झाले. त्यांचा आज दि 21 मार्च रोजी समाजवादी पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी जळगाव वनपरिक्षेत्र कार्यालय मध्ये जाऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी सय्यद नफीज यांनी जळगाव वनपरिक्षेत्र भरभटीस  येवो तसेच जंगलात होत असलेली अवैध वृक्षतोड, गोंद तस्करी यावर जळगाव वन विभागाने आळा घालावा असा यावेळी मानस व्यक्त केला. यावेळी  वनपरिक्षेत्रातील कर्मचारी गजानन कुटे, वनपाल गव्हांदे साळवे तसेच सेवानिवृत्त वनपाल ताडे यावेळी उपस्थित होते. यावेळी वनपाल जाधव यांनी सय्यद नफीस यांचे आभार मानले व वनपरिक्षेत्रातील कामे करीत असताना अडचणी निर्माण होतात त्यावेळी सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here