जळगाव जामोद,दि११(प्रतिनिधी):
प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा सम्पूर्ण ३६५दिवस व्हावा तर देशाची जगाची प्रगती मध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे असे उदगार डॉ संजय कुटे यांनी बोलताना काढले
महिला दिनानिमित्त पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी महिलांचा सन्मान ८ मार्च रोजी कार्यक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी ८ मार्च रोजी करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार डॉ.संजय कुटे होते.यावेळी आमदार डॉ संजय कुटे यांनी स्टेज वर न बसता सर्व महिलांना स्टेज वर बसण्याचा सन्मान दिला.आजचा कार्यक्रम हा महिलांचा असून त्या संपूर्ण राज्यामध्ये प्रमुख पदावर विराजमान आहेत. असल्याने हाच त्यांचा खरा सन्मान असल्याचे डॉ कुटे यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या चतुर्थ श्रेणी च्या काटकर ताई यांना अध्यक्ष स्थान देऊन त्यांच्या ३० वर्षाच्या सेवेत असे कधीही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले.तर यावेळी डॉ संजय कुटे व गटविकास अधिकारी संदीप मोरे यांचे हस्ते महिलांना भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भगत यांनी केले. जळगाव जामोद तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी महिलांचा असा सन्मान पहिल्यांदाच करण्यात आल्याचे उद्गार यावेळी महिलांनी काढले. राष्ट्रमाता मा जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई,माता रमाई यांच्या कार्याचा उल्लेख यावेळी आमदार डॉ संजय कुटे यांनी करून विधानभवनात सुद्धा कालचा दिवस पूर्ण भगिनींच्या सन्मानार्थ गेल्याचे सांगितले तसेच गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी प्रभार घेतल्यापासून पंचायत समिती मध्ये त्यांचे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून त्यांचेही कौतुक यावेळी करण्यात आले,
या प्रसंगी पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी रवी इंगळे सह इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते ,ग्रामसेवक संघटनेचे पवन पवार अनिल अंबडकार, सोबतच ज्या महिलांचा सन्मान करण्यात आला त्या पंचायत समितीच्या शुभांगी राठोड,सुषमा शेलारे, शुभांगी सोळंके,स्वाती नेमाडे,सुषमा कुळसूनगे,ललिता चित्रे,वैशाली तायडे, वैशाली भगत,पर्यवेक्षिका रेखा जयदेव वानखडे,गीता माणगावकर, सुनीता वानखडे,ग्रामपंचायत अधिकारी कुं संगीता शेजुळ,कुं कविता जंजाळकर,त्रिगुणा मांडोकार,रोहिनि शेळके स्नेहल पाटील,रेणुका माकोडे,प्रगती पुनगळे,स्वाती रोहनकार,रेणुका माकोडे,पूनम सोळंके या कार्यक्रमाला उपस्थित होत्या..