जळगाव जा,दि१०(प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत समोर गावातील काही नागरिकांनी घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे..

सुनगाव येथीलच उपोषणकर्ते मोहनसिंह फकिरचंद्रसिंह राजपूत, सुरेश भिकाजी जोशी व अरुण रामलाल दुबे यांनी दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी घरकुल यादी मधून वगळण्यात आलेली नावे यादीमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात यावी या मागणीचे निवेदन सूनगाव ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना दिले होते. परंतु यावर कोणतीही प्रक्रिया न करता येथील नागरिकांना घरकुलाच्या लाभापासून मुकावे लागणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील जुन्या घरकुल यादीमध्ये या उपोषणकर्त्यांची नावे समाविष्ट असून आता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या घरकुल यादी मधून या लाभार्थ्यांची नावे रद्द करण्यात आली आहेत. याविषयी उपोषणकर्त्यांनी ग्रामसेवक ग्रामपंचायत सुनगाव व सरपंच यांना याबाबत वेळोवेळी विचारणा केली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी हितेंद्र जोशी यांनी आपली नावे सिस्टीम अंतर्गत रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे मोहनसिंह राजपूत, सुरेश जोशी, अरुण दुबे यांनी आपली नावे घरकुल यादीत समाविष्ट करून घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक १० मार्चपासून आमरण उपोषणास बसले आहेत.. या आमरण उपोषणाला सरपंच रामेश्वर अंबडकार, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन दातीर, रामेश्वर केदार, रमेश वंडाळे, विष्णू येऊल, प्रमोद वानखडे, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, रामेश्वर ठोसर, अमोल येऊल, सुनील भगत, रमेश कोथळकार, प्रकाश ताडे, लक्ष्मण काटोले, गणेश अंबडकार, वसंत ताडे यांनी भेटी देत उपोषणाला आपला पाठिंबा दिला…
____________________________
प्रतीक्रिया
उपोषण कर्ते मोहनसिंह राजपुत व गावकऱ्यांच्या घरकुल प्रश्नी पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करून सदर उपोषणकर्त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार व उपोषणकर्ते मोहनसिंह राजपूत, सुरेश जोशी, अरुण दुबे व अन्य गावकरी यांना घरकुलाचा लाभ मिळवून देणार…
रामेश्वर अंबडकार
सरपंच ग्रामपंचायत सुनगांव…