जळगाव जामोद दि१० (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य शासन यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता ७ कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे या कार्यक्रमांतर्गत प्रशासनास येत्या १०० दिवसात प्राधान्य करावयाच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिलेल्या निर्देशानुसार शैलेश काळे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पवन पाटील तहसीलदार यांच्या उपस्थितीत दि. १० मार्च रोजी सांस्कृतिक भवन येथे महसूल अदालत चे आयोजन करण्यात आले होते.सदर महसुली अदालत मध्ये भारत किटे नायब तहसीलदार यांनी

अग्रीस्ट्रेक ,पादण रस्ते, जिवंत सातबारा, पुरवठा विभाग, मतदार यादी अद्यावतीकरण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तहसीलदार संजय मारकंड आणि मयुरेश भुजबळ यांनी सुद्धा नागरिकांना मार्गदर्शन केले.मार्गदर्शन याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून आपले विविध दाखले घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
पी. एम.किसान चे ७२ प्रकरणे, संजय गांधी १९८ वारस प्रकरण,१३ ॲग्रीस्टेक,२३ आधार प्रमाणीकरण,१९रेशन कार्ड ची १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
मंडळ अधिकारी सुरेश राठोड, जळगाव मंडळ ग्राम महसूल अधिकारी एस एम देशमुख, विशाल शिंदे, सागर त्रिभुवन, गोपाल कोरडे, कु आरती नारे आणि मंडळातील महसूल सेवक गुणवंत जाधव, सखाराम डावर, एम एस चोपडे व प्रवीण राठोड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.