जळगाव जामोद,दि१०( प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुका समाजवादी पार्टीच्या वतीने समाजवादी पार्टीचे आमदार अबू आसिम आझमी यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेऊन तसेच त्यांना झेड सुरक्षा प्रधान करण्याबाबतचे निवेदन दिनांक १० मार्च २०२५ रोजी तहसीलदार यांचे मार्फत राज्यपाल यांना देण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ मार्च २०२५ रोजी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा विधानसभेचे आमदार अबू आसिम आझमी यांनी विधानसभा सभागृहाबाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधला व औरंगजेब यांच्या व्यक्तीत्वावर भाष्य केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे विधानसभेमध्ये तीव्र पडसाद उमटले होते यावरून आमदार अबू असीम आझमी यांचे निलंबन अधिवेशन संपेपर्यंत करण्यात आले आहे याचा तीव्र निषेध जळगाव जामोद शहरात समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला तसेच तहसीलदार यांच्यामार्फत आमदार अबू आसीम आझमी यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस , जिल्हा संपर्कप्रमुख अब्दुल साबीर, सय्यद कमर असलम, शेख इमरान, शेख असलम, अतिक पैलवान यांच्यासह बहुसंख्य समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.