श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात महिला दिन साजरा

0
21

जळगाव जामोद,दि१०(प्रतिनिधी):

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दि ८ मार्च रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे जागतिक महिला दिन तसेच पारंपारिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अनिताताई जयस्वाल यांची उपस्थिती लाभली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश मायी हे होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती, संत गाडगेबाबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अनिताताई जयस्वाल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्त्री ही केवळ सौंदर्याची नव्हे तर शक्ती आणि सामर्थ्याची मूर्ती आहे ,जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथेच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होतो. स्त्रीशक्तीचा जागर हाच समाजाच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याची  भावना  त्यांनी आपल्या भाषणांतून  व्यक्त केली.  याच प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव घुले, पर्वत सपकाळ, नेहा वानखेडे, पल्लवी माकोडे, गायत्री ढगे ,प्राची चौधरी ,सुजाता ,कीर्ती दाभाडे या विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून महिला सुरक्षा व महिला सबलीकरण याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी निबंध लेखन स्पर्धेमध्ये भाग घेऊ निबंध सादर केले. याप्रसंगी मंचावर उपस्थित प्राध्यापिका सौ जोशी मॅडम तसेच सौ भोपळे मॅडम यांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला . बहुसंख्य महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा करून कार्यक्रमाला उपस्थित राहीले. आजच्या काळातील स्त्रियांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक  व सर्व क्षेत्रांमध्ये आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखवले , विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर  होऊन राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व समाजातील अनेक स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन जीवनातील सर्व क्षेत्रात प्रगती करून आपले स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मायी यांनी  केले . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख तसेच सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉ गिरीश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन कला  शाखेच्या विद्यार्थिनी कु. प्राची शेळके तर आभार प्रदर्शन कु कीर्ती दाभाडे या विद्यार्थिनीने केले .कार्यक्रमाला प्राध्यापक गवई,  प्रा. चव्हाण ,प्रा बावस्कर ,प्रा सचिन उनटकाट , बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गजानन वानखेडे समाधान, निलजे व बाबुराव चव्हाण यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here