जळगाव जामोद,दि६(प्रतिनिधी):
जळगाव जामोद येथील कृष्णा नगर येथील मनोज वानखडे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून तब्बल १लाख ८० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि५ मार्च च्या मध्यरात्री घडली आहे.
यासंदर्भात फिर्यादी मनोज वासुदेव वानखडे रा धानोरा महासिद्ध व्यवसाय मेडिकल एजन्सी सध्या मुक्काम कृष्णा नगर जळगाव जामोद यांनी दि ६ मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार
दि५ मार्चच्या रात्री फिर्यादी यांचे घराचे कुलुप तोडुन घरांच्या बेडरुमधील कपाटातुन फिर्यादी यांची पत्नीचे सोन्याचा राणीहार ४२ ग्रॅम अंदाजे किंमत १०५०००/- रु, सोन्याचा नेकलेस १५ ग्रॅम अंदाजे किंमत ३७५००/- रु, सोन्याची छोटी पोत ५ ग्रॅम अंदाजे किंमत १२५००/- रु, सोन्याची अंगठी ५ ग्रॅमची अंदाजे किंमत १२५००/-व सोन्याचे कानातील ५ ग्रंम अंदाजे किंमत १२५००/- रु असे सर्व सोन्याचे दागिने एकुण किंमत १,८००००/-रु कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले आहे. फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक१२९/२०२५ प्रमाणे कलम कलम ३०५ (ए) ३३१(४) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत.