प्रतिनिधी मंगेश बहुरूपी :-
खामगांव :- जनसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ – सेवा रक्तसेवा फाउंडेशन कडून खामगांव येथील सामान्य रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा गेल्या मागील वर्षांपासून खंडीत पडलेली आहे अश्यातच बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खामगांव तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील गरीब गरजु रुग्ण उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगांवात येतात 15 गरजु रुग्णांना बाहेरून लागणाऱ्या एम आर आय, सोनोग्राफी, औषधी, फळफ्रूट, तपासणी, दिव्यांग व्यक्तीला सायकली साठी आर्थिक मदत करण्यात आली. मदत करण्यात आलेल्या रुग्णमध्ये खामगांव शहरातील 3 रुग्ण खामगांव तालुक्यातील 8 तर नांदुरामधील 2 पुणे येथील 1 बुलढाणा जिल्हातील 1 अश्या 15 गरजु लोकांना एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे 17,763 उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. या रुग्ण कार्यासाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
सुरजभैय्या यादव सचिव ज्ञानेश सेवक सर, यांच्यासह प्रदीप शमी, तुषार जोशी, चेतन कदम,निलेश भाटी, जितेंद्र मच्छरे, सिद्धेश्वर निर्मळ,विजयसिंह ठाकुर, रोहन इंगळे, सागर ठोसरे, शिवम मानकर, सागर दाभाडे, शुभम क्षीरसागर आदि लोकांनी एक हात मदतीचा देत निःश्वार्थ भावनेने मदत केली अशी माहिती रवींद्र दिपके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.