मंगेश बहुरूपी:-
रथसप्तमी निमित्त
रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर पाट ठेवतात. त्या पाटावर तांबड्या चंदनाने सात घोड्यांचा रथ काढून त्या रथांत सारथ्यासह सूर्यदेवाची प्रतिमा काढतात.
नंतर तांबडे गंध, तांबडी फुलें व पूजेचे साहित्य घेऊन पूजा करतात. सूर्यदेवला नैवेद्याकरिता खीर करतात. या दिवशीं मातीच्या भांड्यांत दूध घालून ते भांडे अंगणांत गोवर्या पेटवून त्याच्यावर दूध उतास जाईपर्यंत ठेवतात.
रथसप्तमी माघ शुध्द सप्तमीला रथसप्तमी असे म्हणातात.
हा दिवस सूर्यदेवाप्रीत्यर्थ पाळावा असे भविष्यादिक पुराणात सांगितले आहे. सूर्य हा एक तेजोमय गोल आहे व त्याच्याभोवती पृथ्वीसारखे इतर कित्येक
गोल फिरत असतात हे खरे आहे. तथापि सूर्याकडून मानवी सुखास साह्यभूत अशा गोष्टी घडून येत असल्यामुळे प्राचीनकाळापासून त्यांचे देवत्व मानू लागले.
अर्थातच त्याची पूजा सुरु झाली.
सूर्योपासोनेचा
मुख्य हेतू आरोग्य व तदनुषंगाने उत्पन्न होणारे सुख भोगावे हा आहे.
हा मान्यतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात घोडे जुंपिलेल्या नवीन रथातून आकाशमार्गाने फिरावयास निघते या समजुतीने
त्याला रथसप्तमी हे नाव मिळाले आहे.