जळगांव जामोद पंचायत समितीची आमसभा २८ फेब्रुवारी होणार

0
53

जळगांव जामोद,दि२६(प्रतिनिधी):

सन २०२४/२०२५ या वर्षातील आढावा व २०२५/२०२६ मधील नियोजन यासाठी वार्षिक आमसभा तथा सरपंच मेळावा दि२८ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती प्रांगणात आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

वार्षिक आमसभा सरपंच मेळाव्यामध्ये ग्रामीण भागातील विविध विषयावर माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे हे आढावा घेणार असून सोबतच सरपंच मेळाव्यामध्ये प्रशासकीय बाबीचे नियोजन करण्यात येणार आहे या आमसभेसाठी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे तसेच महसूल विभाग  उपविभागीय अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जीवन प्राधिकरण, आरोग्य विभाग, बांधकाम उपविभाग जिगाव प्रकल्प अधिकारी विजवीतरण, एसटी महामंडळ अधिकारी यांना सुद्धा या सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहेमागील मधल्या चार ते पाच वर्षाच्या काळामध्ये विविध अडचणीमुळे आमसभा व सरपंच मिळावा होऊ शकलेला नाही त्यामुळे या आमसभेत विविध विषयावर चर्चा होणार आहे.

मागील मधल्या चार ते पाच वर्षाच्या काळामध्ये विविध अडचणीमुळे आमसभा व सरपंच मिळावा होऊ शकलेला नाही त्यामुळे या आमसभेत विविध विषयावर चर्चा होणार आहे.

दि२८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आमसभेत कोणाच्या काही समस्या असतील त्यांनी दि२७ पूर्वी लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here