वडगाव गड येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा शिवजयंती उत्साहात साजरी

0
35

जळगाव जामोद,दि२३(प्रतिनिधी):

वडगाव गड येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली 

यावेळी उपस्थित बजरंग गणेश उत्सव मडळ, आणि इतर गावकरी मंडळी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग राबवला सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे दीप प्रज्वलन करुन हारार्पन करण्यात आले 

गावातील लोकांनी शुभम वडोदे, शुभम काळे, समाधान पाटील यांनी भाषण प्रास्ताविकातून शिवाजी महाराज यांचा जिवणपरीचय करुन दिला त्यानंतर चिमुकल्यांनी भाषण, नृत्य सादर केले. चिमुकल्यांनी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मत मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मुऱ्हे सह अनंता सरदार यांनी केले. 

कार्यक्रमाला उपस्थित गावकरी मंडळींनी चिमुकल्यांना बक्षिसे देऊन आणखी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here