मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि ९(प्रतिनिधी):
शेतामध्ये हरभऱ्याच्या पिकाला पाणी देण्याकरिता गेलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह सापडल्याने उडाली खळबळ.. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वडगाव गड येथील शेतकरी रामधन उर्फ अशोक उंबरहंडे वय ५५ वर्ष हे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी शेतामध्ये हरभऱ्याच्या पिकाला पाणी देण्याकरता गेले होते. परंतु ते दुपारपर्यंत शेतातून घरी परत आलेच नाहीत. त्यामुळे रामधन उंबरहंडे यांचे लहाने भाऊ संतोष उबरहंडे हे त्यांना शोधायला शेतामध्ये गेले परंतु ते मिळून आले नाहीत. भाऊ संतोष यांनी शेत शिवारातील संपूर्ण परिसराचा शोध घेतला असता मोठे भाऊ रामधन उंबरहंडे हे नदीकाठी पडीत जागेमध्ये मृत अवस्थेत मिळून आले.घटनेची माहिती मृतकाचे भाऊ संतोष उंबरहंडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली.पोलिसांनी मर्ग दाखल करून घटनेचा पंचनामा केला व मृतक रामधन उंबरहंडे यांची मृत शरीर ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे शवविच्छेदन क्रियेसाठी पाठविण्यात आले होते. मृतक रामधन उंबरहंडे यांचा मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.