पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य; 10 मार्चपर्यंत अर्जाची मुदत

0
34

बुलढाणा, दि. 24 (जिमाका): 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, अकोला कार्यालयाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेंतर्गत पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान किंवा अर्थसहाय्यासाठी पारधी, फासेपारधी समाजाच्या लाभार्थ्यांनी दि. 24 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या योजनेचे छापील अर्ज विनामुल्य लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या कार्यालयास अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 10 मार्चपर्यंत असून या मुदतीपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. त्यानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

योजना :

 पारधी समाजाच्या दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर शेळीपालन व्यवसायकरिता ५ शेळी १ बोकडे खरेदी करीता अर्थसहाय्य करणे, या योजनेंतर्गत डीबीटीव्दारे लाभ दिले जातील. २. पारधी समाजाच्या दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर कुकरीज (डीनर सेट) व्यवसायाकरिता अर्थसहाय्य करणे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे 

पारधी व फासेपारधी जमातीचा दाखला प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, दारिद्ररेषेचे कार्ड असल्यास, तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, पासपोर्ट फोटो, विधवा असल्यास प्रमाणपत्र सादर करावे, दिव्यांग प्रमाणपत्र,परितक्ता प्रमाणपत्र असल्यास सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here