दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

0
32

बुलढाणा/शेगांव, दि ११(प्रतिनीधी) : 

राज्याचे गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॅा.पंकज भोयर हे आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दिव्यांग बांधव तसेच अनाथ बालकांसह शेगांव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. 

राज्यमंत्री डॅा.भोयर यांनी श्री गजानन महाराज संस्थानचा आढावा यावेळी घेतला. तसेच वर्धा जिल्ह्यातून आलेल्या दीडशे दिव्यांग बांधव तसेच अनाथ बालकांना दर्शन घडवून दिले. तसेच त्यांच्यासोबत महाप्रसादाचा लाभही त्यांनी घेतला. संस्थानच्या वतीने त्यांचे सपत्नीक यथोचित स्वागत सत्कार करण्यात आले. 

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा निबंधक नानासाहेब देशमुख, उपशिक्षणाधिकारी (मा) आशिष वाघ, उपशिक्षणाधिकारी (प्रा) अनिल देवकर, सहायक कार्यक्रम अधिकारी मंगेश भोरसे,गटशिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here