सामाजिक कार्यकर्ते सुरजभैय्या यादव यांना 8 राज्यातून सम्मानपत्र

0
48

प्रतिनिधी ( मंगेश बहुरूपी ) :–
आपल्या खामगांव शहर येथील रहिवासी एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आरोग्य, रक्त सेवा समिती विदर्भ प्रमुख
सुरजभैय्या यादव यांनी रक्तदान जागृती करून नवीन रक्तदाते तयार करत युवकांना प्रेरणा देऊन गरजु रुग्णांना वेळोवेळी आपल्या स्तरावरून हजारो रुग्णांना रक्तदान सेवेतून जिवन संजीवनी दिली त्यांची निःस्वार्थ रुग्णसेवा पाहुन त्यांना आपल्या भारत देशामधील अनेक राज्यातून राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानीत करून गौरविण्यात आले. एकनिष्ठा फाउंडेशन मिञ मंडळाच्या सहकार्याने सामाजिक कार्य सुरू असलेले सेवाकार्य पाहुन आठ संस्था कडून दिनांक 8/02/2025 रोजी सुरजभैय्या यादव यांना सम्मानपत्र देणाऱ्या खालील संस्था

1) (समाज सेवक सेवा सम्मान 2025) हिन्दू सोशल वर्कर्स चंदीगढ पंजाब राष्ट्रीय अध्यक्ष सनातनी संजीव गोयल
2) (सम्मानपत्र) सविऔर्स द ब्लड ऑरगॅनिझन जे & के जम्मु कश्मीर अध्यक्ष बलविंदर सिंग.
3) (रक्तवीर सम्मान पत्र) जन कल्याण रक्तदान समुह छपरा संस्थापक अजित कु. सिंह
4) (बेस्ट लिडरशिप अवार्ड 2025) एकता एज्युकेशन सोशल ऑर्गनायझन नागपुर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जय रामटेके
5) (जीवन रक्षा पुरस्कार 2025) हाडोती ब्लड डोनर सोसायटी कोटा राजस्थान अध्यक्ष मनोज चंचलानी
6) (नर सेवा सम्मान 2025) भगत सिंह हे हेल्पिंग चैरिटेबल ट्रस्ट संस्थापक चेतन गंगावर देवभूमी उत्तराखंड.
7) (उत्कृष्ट सेवा कार्य सम्मान 2025) मुस्कान मानव सेवा समिति प्रदेश अध्यक्ष रईस खान उज्जैन एम पी.
8) (रक्तवीर सम्मान पत्र) जन सेवा रक्तदान समिति भारत संस्थापक जोएब आसिफ म.प्र. आदि संस्था कडून एकनिष्ठा गौ – सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव यांना सम्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अशी माहिती एकनिष्ठा फाउंडेशन तालुकाध्यक्ष गोपाल ईटीवाले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here