मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि,८(प्रतिनिधी):
येनगाव बस स्टँड ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करा, या मागणी करिता ग्रामस्थांचे बस स्टँड वर आमरण उपोषण चालू केले होते त्याचे दिनांक आठ फेब्रुवारी बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानुसार सांगता करण्यात आली.
दिनाक ७/२/२०२५रोजी जळगाव जा तालुक्यातील येनगाव येथील ग्रामस्थांचे रस्ता बांधकाम करा या मागणी करिता बस स्टँड उपोषण सुरू केले उपोषण पूर्वी गावातील अरविंद जानराव वयझोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जा व जिल्हा परिषद विभाग बुलडाणा यांना दिनाक ६/२/२०२५ रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केले होते सदर दिलेल्या निवेदनात येनगाव येथील बस स्टॉप पासून गावापर्यंत गेल्या १२वर्षापासून रस्ता झालेला नही त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्ता बनविण्यात यावा याकरिता वेळोवेळी निवेदन सादर केले तरी सुद्धा निवेदनाची दखल घेतली नाही. सदर स्तरावरून कारवाई केली नाही
यावेळी दिलेल्या निवेदनात
रस्ता तत्काळ बांधकाम करा अन्यथा,लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता . तरी सुद्धा प्रशासनाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने अखेर अरविंद वायझोडे यांना उपोषणास बसावे लागले. सदर उपोषणास संपूर्ण गांवकर्यानीं पाठिंबा दिला. आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला, यावेळी तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक,अशोक मुरुख, सुहास वाघ, आदित्य प्रसेनजीत पाटिल, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे,युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, शिवसेनेचे अमोल दाभाड़े, यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी रामेश्वर वायझोडे, वासुदेव वायझोडे,महादेव भारसाकळे, प्रमोद वायझोडे,राजेश वायझोडे,गणेश कुकड़े, अरुण वायझोडे, विद्याधर वायझोडे यांच्यासह मोठ्या संख्येने गांवकरी उपस्थित होते. ह्यावेळी उपजिल्हा अभियंता पुंडकर साहेब व तालुका अभियंता भेलके साहेब सुध्दा उपस्थित होते.