मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि८(प्रतिनिधी):
दि. ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वकिल खान,प्रमुख पाहुणे सरपंच सौ शितल वानखडे, माजी सरपंच श्री राम वानखडे, उपाध्यक्ष सौ पायल जाधव, सौ प्रतिभा डांगे,सौ स्वाती खोद्रे, सौ गीता ढगे, अनिल भगत, गणेश डांबरे, अमर भगत, शिवरतन दाते,मुख्याध्यापक विजय म्हसाळ हे होते.
वडशिंगी शाळेत नेहमीच विद्यार्थ्यांना रोख रकमेऐवजी वस्तू रुपात बक्षीस दिले जाते.आजही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्ता असणारे ३०० रुपये किमतीचे १६८ स्टडी टेबल चे वितरण करण्यात आले.यामागे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि गुणवंत विद्यार्थी घडावे हाच एकमेव उद्देश शाळेचा आहे.

विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या दात्यांनी विद्यार्थ्यांना रोख रुपात दान दिले त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.माजी सरपंच राम वानखडे यांनी सर्वाधिक पाच हजार रुपये, गटविकास अधिकारी मा श्री संदीपकुमार मोरे साहेब यांनी एकवीसशे रुपये पारितोषिक दिले होते.
सर्व दात्यांनी सढळ हातांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे वडशिंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्टडी टेबल मिळाले.यामुळे विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय म्हसाळ सर,सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर सर तर आभार प्रदर्शन सारंगधर बांगर सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक श्री संतोष हिस्सल सर,सौ सुनीता येनकर,सौ वर्षा राजगुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.