देशाभिमान बाळगून सामाजिक बांधिलकी जपत आई-वडिलांना अभिमान वाटेल असे नागरिक बना.पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे मुंबई.

0
50


मंगेश राजनकार :-     

                        
नुकताच जनता विद्यालय जामोद येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम २०२४-२५…. मुख्याध्यापक राजेंद्रसिंह राजपूत यांचे अध्यक्षतेखाली तर मुंबई येथील पोलीस निरीक्षक शाळेचे 1987 च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री प्रमोद कोकाटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडला. सदर निरोप समारंभ कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री अभिजीत कुलकर्णी सर तसेच सर्व शिक्षक वृंद, जनता विद्यालय जामोद उपस्थित होते.विद्येचे आराध्य दैवत माॅं सरस्वती यांच्या प्रतिमापूजनानंतर  “जामोद गावची शान -जनता विद्यालयाचा अभिमान “, श्री प्रमोद कोकाटे पोलीस निरीक्षक, मुंबई यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थी तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लालसिंग निंगवाल सर यांनी केले.                            
जनता विद्यालयाचा वार्षिकांक हस्तलिखित “झेप” या अंकाचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रमोद कोकाटे, पोलीस निरीक्षक, मुंबई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना श्री प्रमोद कोकाटे यांनी आतापर्यंत जनता विद्यालयाच्या इतिहासात जामोद मधून सर्वप्रथम 1972 च्या बॅचच्या प्रमोद कोकाटे यांच्या ज्येष्ठ भगिनी कुमुद श्रीराम कोकाटे (उमाळे ह.मु. पुणे) ह्या त्या काळात पहिल्यांदा मेरिट आल्या तर नंतर शाळेची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली त्याचप्रमाणे या विद्यालयातून नामांकित असे डॉक्टर, इंजिनियर, वकील पोलीस विभाग ,वैमानिक, शास्त्रज्ञ, व्यापारी इ.सर्व आघाड्यांवर येथील माजी विद्यार्थ्यांनी झेप घेतली त्याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना अवगत करून पुढील आयुष्यातील करिअरच्या संधी याबाबत प्रकाश टाकुन प्रखर देशाभिमान बाळगून सामाजिक बांधिलकी जपत आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचा विसर न पडू देता आपले उच्च ध्येय गाठावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. निरोप समारंभ कार्यक्रमाचे संचालन मनीष सारभुकन सर तर आभार प्रदर्शन श्री अमोल बैरागी सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते करिता वर्ग ५ ते १० च्या सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य  केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here