मंगेश राजनकार
जळगांव जामोद,दि२५(प्रतिनिधी):
ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्ली डॅा बी.आर.आंबेडकर भारतभुषण सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला असून भारतातील विविध राज्याच्या विविध क्षेत्रातील कार्यकरणा-याना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील अधीक्षक संजय गाडेकर यांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी डॅा बी.आर.आंबेडकर भारतभुषण सन्मान राष्टीय पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे,
दि. ९ मार्च २०२५ ला नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात येत असलेल्या या सम्मान सोहळ्यात राष्ट्रीय महीला आयोगाच्या अध्यक्षा मा.विजया राहाटकर यांच्या उपस्थितीत तसेच प्रमुख अतिथी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले,केंद्रीय राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सन्मान पत्र,स्मृति चिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्हयातील विविध क्षेत्रात अनेक नामवंत व्यक्तींनी महत्वपुण कार्य केले आहे.त्यांच्याच रुपाने जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील अधीक्षक संजय गाडेकर यांचे रुपाने नेतृत्तव करण्याची संधी प्राप्त झाली आहे.त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक योगदानासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार महाविद्यालयाच्या नावाच्या लौकिकात निश्चितच भर घालणारा आहे.जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल,सचिव अनुप पुराणिक,प्राचाय डॅा.गिरीश मायी सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कमचारी यांनी अभिनंदन केले आहे.