जळगाव जामोद तालुक्यात जीबीएस चा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग तसेच नागरिकांमध्ये खळबळ

0
44

जळगाव जामोद ,दि२५(प्रतिनिधी):

तालुक्यातील ग्राम खेर्डा बुद्रुक येथील साडेआठ वर्षे वय असलेल्या बालकाला जीबीएस नावाचा आजार वैद्यकीय तपासणी मध्ये आढळून आला सदर बालकावर सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र मध्ये जीबीएस नावाचे आजाराने सध्या भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यातच खेर्डासारख्या कमी लोकवस्तीच्या गावामध्ये म्हणजे ग्रामीण भागातही आता जीबीएस चा रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे तर जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बालकाला पंधरा दिवसापूर्वीच हातापायात अशक्तपणाचा त्रास सुरू होता त्यांनी स्थानिक ठिकाणी उपचार घेतले त्यानंतर जळगाव जामोद, खामगाव येथील उपचारानंतर त्यांनी अकोला येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेतले त्या ठिकाणीच संबंधित बालकाला वैद्यकीय तपासणी आणि रक्त तपासणी मध्ये १३ फेब्रुवारी रोजी जीबीएस नावाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. अशा आजारावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करणे अतिशय महागड्या स्वरूपाचे असल्याने त्यांनी तात्काळ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ बालकाला भरती केले असून त्याच्यावर शासकीय योजनेमधुन बालकावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.या आजारामध्ये हात पायामध्ये कमजोरी येऊन चालणे,उठणे व बसणे अवघड होऊन जाते. तसेच मेंदूपासून हातापायापर्यंत येणाऱ्या नसांची हालचाल ही कमी होते. त्यामुळे हाता पायामध्ये कमजोरी येते. हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. म्हणजेच या आजारामध्ये स्वतःची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच मज्जातंतूंवर हल्ला करते.जीबीएस हा आजार दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे पसरतो असे डॉक्टरांचे मत आहे. सदर बालकाची प्रकृती सध्या बरी असून पूर्वीपेक्षा २० ते २५ टक्के सुधारणा असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here