जळगाव जामोद,दि२५ (प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील सन २०००-२००१ च्या वर्ग दहावीच्या बॅचचा तब्बल २५ वर्षांनी स्नेह मेळावा गावचे ग्रामदैवत श्री आवजिसिद्ध महाराज मंदिर येथे दिनांक २२ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पी आर जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक बाबाराव कडू, सोनपरोते सर, रामेश्वर कुनगाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत श्री आवजिसिद्ध महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी बबीता सूर्यवंशी काळे, पुनम सारभूखन बोदडे, उज्वला उमाळे इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांसाठी स्वागत गीत गाईले. यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी या सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येत सण २०००-२००१ मधील वर्ग दहावीच्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा दिला. तसेच यावेळी या सर्व वर्ग मित्रांचे माजी मुख्याध्यापक पी आर जाधव, बाबाराव कडु,सोनपरोते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णाताई वंडाळे रेखाते यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता चवटकार दुतोंडे, संगिता दामधर दातार, यांनी मानले. या स्नेहमेलन सोहळ्याचे आयोजन अनिल श्रीराम ढगे यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन हिस्सल, उमेश कुरवाडे, श्रावण धुर्डे संतोष भगत, संदीप हिस्सल, संदीप आगे, वंदना वंडाळे ढगे ,छाया वाडेकर पाठक, रेखा राऊत येऊल, उत्तम ढगे, दीपक आकोटकार, श्रीकृष्ण घोपे, प्रल्हाद ताडे, श्रीराम ताडे, सुनील ढगे ,रामेश्वर गवई, प्रमोद काळपांडे अनिलसिंह राजपूत यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. यावेळी सन २०००-२००१ च्या दहावीतील बॅचमधील सर्व मित्र मैत्रिणी हे आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते.