महाआवास अभियानांतर्गत घरकुल योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघात ५००० लाभार्थ्यांना निधीचे वितरण,९५०० लाभार्थ्यांची घरे मंजूर

0
19

जळगाव जामोद,दि२३(प्रतिनिधी):

ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण अंतर्गत महा आवास अभियान २०२४/२०२५ अंतगत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत राज्यात एकाच दिवशी घरकुल मंजुरी प्रमाणपत्र व प्रथम हपता वितरण कार्यक्रम चे आयोजन दिनाक २२ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती जळगाव जामोद येथे आयोजित करण्यात आला होता.तालुका स्तर व ग्रामपंचायत स्तरावर हा महाउत्सव साजरा करण्यात येत असून मतदार संघात ९६०० घरे मंजुरी व ५००० लाभार्थी याना एकाच दिवशी प्रथम हपता आमदार डॉ संजय कुटे यांच्या सुविध्य पत्नी अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला तसेच बालेवाडी पुणे येथे गृहमंत्री भारत सरकार अमितभाई शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते २० लाख लोकांना मंजुरी देण्यात आली सम्पूर्ण राज्यात हा आवास महोत्सव साजरा होत आहे व यासाठी पंचायत समिती स्तरावर सुद्धा प्राथमिक स्वरूपात लाभार्थी यानचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे,या महोत्सवा सोबतच सातपुडा पर्वताच्या रांगेत अतिक्रमण करून राहत असलेल्या चाळीस टापरी व गोमाल १ व गोमाल २ येथील अतिक्रमण धारकांना सुद्धा त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी यांनी प्रास्ताविक केले ग्रामपंचायत चे सर्व सरपंच व ग्राप अधिकारी यांचे स्वाक्षरीने मंजुरी पत्र देत सर्व पक्षीय पदाधिकारी, पत्रकार बंधू यांची कार्यक्रमातउपस्थिती होती.संदीप कुमार मोरे

गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांचे सह सर्व कर्मचारी वृंद व तालुक्यातील महिला भगिनी पुरुष यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here