आय टी एम यूनिवर्सिटी ग्वालियर मध्ये प्रदेशमध्ये शिवजयंती उत्साहात….

0
101

महाराष्ट्राच्या संकेत वानखडे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करून जिंकली सर्वांची मने…

मंगेश राजनकार 

जळगाव जामोद,दि१९(प्रतिनिधी)

आय टी एम युनिव्हर्सिटी ग्वालियर (मध्य प्रदेश) मध्ये प्रथमच विद्यापीठाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रसंगी महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये असलेल्या खेर्डा बु गावातील संकेत जयदेव वानखडे या एम एस सी एग्रीकल्चर च्या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्कृष्टपणे सादरीकरण करून विद्यापीठाचे कुलगुरूसह उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. 

यावेळी उपस्थित महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसह मध्य प्रदेश केरळ दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश व इतर राज्यातील विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत विद्यापीठ परिसर दनानोन सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here