उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या पत्री शेडचे भुमिपूजन संपन्न
प्रतिनिधी :-
कल्याण तालुक्यातील मोहने-आंबिवली(पूर्व) येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था,जामनेर येथील कल्याण शाखा आणि बंजारा समाज सेवा संस्था,मोहोने यांच्या संयुक्त विद्यमाने बंजारा समाजाचे आराध्य दैवत,क्रांतिकारी संत-सेवालाल महाराज यांची २८६’वी जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली.
यानिमीत्त सर्वप्रथम बंजारा समाज सेवा संस्थेचे ज्येष्ठ संचालक-मा.विठ्ठलभाऊ राठोड यांच्याहस्ते संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा देवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रसादाचा भोग लावण्यात आला.यानंतर डोंबिवली ब्लड सेंटर या रक्तपेढी च्या सहकार्याने महारक्तदान शिबीर चे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा भटक्या-विमुक्त सेल चे प्रदेश संयोजक तथा कल्याण तालुक्याचे माजी आमदार-नरेंद्रजी पवार,विद्यमान कार्यसम्राट आमदार-विश्वनाथजी भोईर यांचे चिरंजीव-वैभवजी भोईर,माजी उपमहापौर-बुधारामजी सरनोबत,माजी नगरसेवक-मयुरजी पाटिल,शिवसेना विभागप्रमुख-अंकुशजी जोगदंड,शिवसेना शहरप्रमुख-रोहनभाऊ कोट,संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण प्रांत संयोजक-कैलासभाऊ पवार,ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य-कैलासभाऊ तंवर,सौ.सुमित्राताई जाधव,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकराव चव्हाण,संस्थेच्या संचालिका-सौ.अनुसयाजी चव्हाण,कल्याण तालुका संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य-सतिषभाऊ राठोड,बंजारा समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष-शंकरभाऊ चव्हाण,समाजसेवक-डॉ.युवराजभाऊ राठोड,भाजपा कल्याण पश्चिम शहर उपाध्यक्ष-रामगणेशजी मिश्रा,सचिव-करुणाशंकरजी मिश्रा,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार-विश्वनाथजी भोईरसाहेब यांच्या निधीतून संत सेवालाल महाराज मंदिरावर उभारण्यात येणाऱ्या पत्री शेडचे भुमिपूजन देखील मा.आ.नरेंद्रजी पवार,वैभवजी भोईर,मयुरशेठ पाटिल,अंकुशजी जोगदंड,बुधारामजी सरनोबत,रोहनभाऊ कोट,समाजसेविका-मालनबाई साठे,बाबा शेख,इ.मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ज्या रक्तदात्यांनी महारक्तदान शिबीरमधे रक्तदान केले अशा रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले आणि यानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी-विक्रमभाऊ चव्हाण,बबलूभाऊ राठोड,रमेशभाऊ राठोड,सोमला राठोड,मिथून राठोड,सुनिल पवार,अंकुश चव्हाण,जगदिशभाऊ जाधव,बळिरामजी राठोड,विनोदभाऊ राठोड,यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन-संस्थेचे संचालक-धनराजभाऊ राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक-सुरेशभाऊ नाईक यांनी केले.