शिवजयंती दिनी जिल्ह्यात ड्राय डे जाहीर

0
29

  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

  शिवजयंती उत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

बुलढाणा, (जिमाका), दि.१७:

यंदा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्सव कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता आबाधित राहावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी बुधवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बीअर बार विक्री दुकाने बंद अर्थात कोरडा दिवस (ड्राय डे) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था व पूर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिजाउ सभागृहात घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॅा. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आदी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

या बैठकीत छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीन आयोजित कार्यक्रमांबाबत आढावा जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी घेतला. बुलढाणा जिल्ह्यात शिवजयंतीचा एकच भव्य कार्यक्रम साजरा व्हावा. शिव छत्रपतींचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद अर्थात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्याचे तंतोतंत पालन करावे व या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कारवाई करावी. तसेच कर्कश आवाजांचे डिजे, डॅाल्बी मर्यादित आवाजात वाजवण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी दिले.

धार्मिक भावना दुखाणारे कृत्य करु नका

जिल्ह्यात शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. या दिवशी आपल्या कृत्यातून कोणत्याही धार्मिक, सामाजिक भावना दुखावणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नागरिकांना केले आहे. 

यावेळी वरिष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचे माहिती या बैठकीत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here