मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि.९(प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील गोराळा धरणाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या छापेमारीत ३ युवकांकडून २ देशी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त करून तीनही आरोपींना अटक करण्यास यश आले आहे. दि.०८/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील गोराळा धरण येथे पेट्रोलिंग करीत असतांना तीन संशयित तरूण त्यांच्या टीव्हीएस ज्युपिटर वाहनांवर जात असताना गोराळा धरणाजवळ असलेल्या हाँटेल समोर पकडून त्यांची झडती घेतली त्या दरम्यान त्यांच्या ताब्यातून २ पिस्तूल व १२ जिवंत काडतुसे व एक टीव्हीएस ज्युपिटर स्कुटी असा एकूण १लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना स्थानिक जळगाव जामोद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.. तीनही आरोपी एकाच गावातील आहेत.आरोपी संदीप संजय काटोने वय २५ वर्ष, सुनील रमेश बकाल वय ३७ वर्ष व शुभम गजानन मुळे वय २५ वर्ष हे तीनही आरोपी राहणार डोणगाव तालुका मेहकर येथील आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस विश्वजी पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी.बी महामुनी,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक लांडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही, यशोदा कणसे, हेड कॉन्स्टेबल एजाज खान, दिगंबर कपाटे, नायक पोलीस कॉन्स्टेबल अनंत फरसाळे, पोलीस कॉन्स्टेबल अजीस परसुवाले, मंगेश सनगाळे, दिपक वायाळ, महिला पोलिस कॉन्स्टेबल पुजा जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश खंडेराव, चालक समाधान टेकाळे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागेश खाडे करीत आहेत.