जळगाव जामोद,दि.७(प्रतिनिधी):
नांदेड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासराबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश पदाधिकारी यांच्या सुचनेने सदस्यांची बैठक घेण्यात येऊन सर्वानुमते आशिष कल्याणे पाटील यांची नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे
दि. ३० जानेवारी रोजी सकाळी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मनोज कामटे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेची विशेष बैठक घेण्यात आली. अखिल भारतीय ग्रामीण
पत्रकार संघाचे दिर्घकाळ महासचिव पद सांभाळलेले लोकमत वार्ताहर आशिष कल्याने पाटील यांना पदोन्नती देवून जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव मांडला यास सर्वानुमते पाठीबां मिळाला.
जिल्हा सचिवपदी नितीन कांबळे यांची सर्वानुमते निवड ,
जिल्हा संपर्क प्रमुख पदी सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ यांची निवड झाली. पत्रकार शिवाजी ऐडके व पत्रकार बैठकीत उपस्थित होते.

नवनियुक्त नांदेड जिल्हा कार्यकारिणी चे नांदेड जिल्ह्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.