माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, मंगेश बहुरूपी : सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व विरपीता यांनी विभागाच्या महासैनिक या (www.mahasainik.maharastra.gov.in ) संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य झाले असून माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच माजी सैनिक व माजी सैनिक याना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे :
सेवा पुस्तिक (डिचार्ज बुक), माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पास बुक, सर्व कुटुबांचे ईसीएचएस कार्ड, सर्वांचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, कॅन्टीन कार्ड, पी.पी.ओ. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार व सैनिक मंगल कार्यालय, बुलढाणा येथे शनिवार व रविवार कागदपत्र जमा करावे. याशिवाय माजी सैनिकांच्या विविध तक्रारी अमृत जवान अंतर्गत तहसिलदाराच्या दालनात सोडविण्यात येणार आहेत.
तालुका दौऱ्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :
मोताळा दि.6 फेब्रुवारी, मलकापूर 7 फेब्रुवारी, नांदुरा 10 फेब्रुवारी , खामगांव 11 फेब्रुवारी, शेगांव 12 फेब्रुवारी, चिखली 13 फेब्रुवारी, मेहकर 14 फेब्रुवारी वार शुक्रवार, लोणार 17 फेब्रुवारी, सिंदखेडराजा 18 फेब्रुवारी, देऊळगांवराजा 24 फेब्रुवारी, संग्रामपूर 25 फेब्रुवारी, जळगांव जामोद 27 फेब्रुवारी, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेनुसार सोमवार ते शुक्रवार असेल.